Diwali 2025 : लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजसह जाणून घ्या दिवाळीच्या सणांचा शुभ मुहूर्त आणि अचूक विधी

Diwali 2025 : यंदा दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 पासून साजरी होणार आहे. या ठिकाणी आपण दिवाळीच्या प्रमुख सणांचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.

Continues below advertisement

Diwali 2025

Continues below advertisement
1/11
गणेशोत्सवानंतर आपण शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहिला. आता नवरात्रोत्सवानंतर सर्वांनाच दिवाळीची आतुरता लागली आहे.
2/11
खरंतर, दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच दिवाळीची ओढ लागली असते.
3/11
दिवाळीला लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि दिवाळी पाडवा या सणांना फार महत्त्व आहे. त्यानुसार, यंदा म्हणजेच 2025 च्या दिवाळीला हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत तसेच यंदाची दिवाळी नेमकी कधी हे जाणून घेऊयात.
4/11
यंदाची दिवशी 18 ते 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरी होणार आहे.
5/11
त्यानुसार, 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला महत्व आहे. खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी 12:18 ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत आहे.
Continues below advertisement
6/11
त्यानंतर, नरक चतुर्दशीचा दिवस असतो. या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात. या दिवसाचं महत्त्व म्हणजे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
7/11
दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदा 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन होणार आहे. पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे की 21 ऑक्टोबरला.
8/11
दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी अमावस्या 20 ऑक्टोबरला सुरू होऊन 21 ऑक्टोबरपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजेच, सोमवारी साजरी केली जाईल.
9/11
22 ऑक्टोबर 2025 ला बालिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास असतो.
10/11
दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच भाऊबीजेचा सण साजरा करतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन देतो
11/11
दिवाळीतील 'हे' महत्त्वाचे 5 दिवस 18 ऑक्टोबर 2025 - धनत्रयोदशी 20 ऑक्टोबर 2025 - नरक चतुर्दशी 21 ऑक्टोबर 2025 - लक्ष्मीपूजन 22 ऑक्टोबर 2025 - बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा 23 ऑक्टोबर 2025 - भाऊबीज
Sponsored Links by Taboola