Diwali 2023: दिवाळीच्या रात्री करू नका 'या' चुका; अन्यथा तुमचं संपूर्ण आयुष्य जाईल दुःखात अन् अंधारात
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला काय प्रिय आहे आणि काय अप्रिय याची काळजी घ्यायला हवी. दिवाळीच्या दिवशी धनाची देवी असलेल्या लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टीच कराव्या. यंदाची दिवाळी (Diwali 2023) रविवारी, 12 नोव्हेंबरला साजरी होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील देवी लक्ष्मी नाराज होईल, असं काहीही करू नका. कारण या दिवशी घराभोवती लक्ष्मीचा वास असतो. या दिवशी लक्ष्मी आपल्या भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते. या दिवशी देवी लक्ष्मीला नाराज करणं म्हणजे आपल्या जीवनात दारिद्र्य आणि दुःखाला आमंत्रण देणं आहे.
अनेकदा लोक दिवाळीच्या रात्री पूजेनंतर घरी बसून पत्ते किंवा जुगार खेळतात. अनेक ठिकाणी असं करणं हा परंपरेचा भाग आहे. पण असं करणं चुकीचं आहे.
दिवाळीच्या पवित्र दिवशी जुगार खेळणं अशुभ आहे. जुगारामुळे पांडवांना वनवास भोगावा लागला आणि नंतर महाभारत युद्ध झालं.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महिलांचा आदर केला पाहिजे, असं शास्त्रात सांगितलं आहे. पती-पत्नीने दिवाळीच्या रात्री ब्रह्मचर्य व्रत पाळावं. या दिवशी घराव्यतिरिक्त शरीर आणि मनही शुद्ध राहिलं पाहिजे.
दिवाळीच्या रात्री घरी लक्ष्मीचं आगमन होतं. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी चुकूनही घरी तामसिक पदार्थ बनवू नका किंवा खाऊ नका. या दिवशी मांसाहार पूर्णत: टाळा.
दिवाळीत मांसाहार, दारू किंवा कोणत्याही प्रकारच्या सूडबुद्धीचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. अशा घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. त्यामुळे दिवाळीच्या रात्री मद्याचं सेवन देखील करू नका.
यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) आणि लक्ष्मीपूजन आहे आणि त्याआधी दोन दिवस, म्हणजेच 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे.
धनत्रयोदशीला धनदात्री देवी लक्ष्मी आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा केली जाते.
सर्व नियम पाळून देवीची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.