Dev Diwali 2023 Date : कधी आहे देव दिवाळी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 2023 मध्ये पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी येत आहे, त्यामुळे या दिवशी देव दिवाळीचा सण साजरा केला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेव दिवाळीच्या दिवशी लोक गंगेत स्नान करतात आणि गंगेच्या तीरावर दिवे लावले जातात.
या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर या राक्षसाचा वध केला होता असं मानलं जातं. राक्षसापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी देवी-देवता दिवाळी साजरी करण्यासाठी काशीच्या गंगा घाटावर उतरले होते.
सर्व देव ही गंगा दिवाळी साजरी करतात, म्हणूनच हा दिवस देव दीपावली म्हणून ओळखला जातो.
देव दिवाळीच्या दिवशी गंगा स्नान आणि दिवे दान करण्याचं विशेष महत्त्व आहे.
देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त रविवार, 26 नोव्हेंबर 2023 च्या संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत, म्हणजेच प्रदोष काळात आहे.
या दिवशी संध्याकाळी पिठाचे 11, 21, 51, 108 दिवे बनवून त्यात तेल टाकून नदीच्या तीरावर दिवे लावावेत.
देव दिवाळीच्या दिवशी देवी देवतांची विधीवत पूजन केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असं म्हटलं जातं. या दिवशी नदीत स्नान करण्याला आणि दिवे दान करण्याला विशेष महत्व आहे.
देव दिवाळीच्या दिवशी देवी-देवता पृथ्वीवर अवतरतात आणि काशीमध्ये दिवाळी साजरी करतात असं म्हटलं जातं, त्यामुळे या उत्सवाला देव दिवाळी असंही म्हटलं जातं.
देव दिवाळीला काशी आणि गंगेच्या घाटांवर फार गर्दी दिसून येते. या दिवशी तेथे दीपदान केले जाते.