Datta Jayanti 2024 : नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह; जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, कृष्णा नदीत स्नानासाठी हजारोंची झुंबड
कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झाले आहेत.
दत्त जयंतीनिमित्त मुख्य मंदिरात सायंकाळी 5 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.
दत्त जयंतीनिमित्त कृष्णा नदीत मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात दत्त जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने मंदिरातील सर्व यंत्रणा देखील सज्ज आहे.
दत्त दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात आदी राज्यातून हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत.
भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
संध्याकाळी 5 वाजता जन्माकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे.
रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्रो उशिरा शेजारती होणार आहे.
श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉल येथे भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.