Chintamani Aagman 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; देखणं रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
मुंबईतील बहुप्रतिष्ठीत चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा गाजावाजात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा गणपतीच्या मूर्तीचं स्वरुप काहीसं हटके आहे.
लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं 105वं वर्ष आहे.
बाप्पाची मूर्ती सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे.
चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक. त्यामुळे चिंतामणी गणपती गणेशोत्सव काळात भक्तांचं विशेष आकर्षण आहे.
ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला.
तसेच, बाप्पाचा मंडपदेखील भव्य पद्धतीने सजवण्यात येणार आहे.
31 ऑगस्टला जल्लोषात बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आहे.
बाप्पाच्या पहिल्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी चिंचपोकळीत पाहायला मिळाली.