Chanakya Niti: हसतं-खेळंत घर होईल उद्धवस्त! 'अशा' लोकांना घरी बोलवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! चाणक्यनीतीत म्हटलंय..

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष यांच्या आधारे काही धोरणे तयार केली आहेत. या धोरणांच्या संकलनाला चाणक्यनीती असे म्हणतात, ज्यामध्ये मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे पालन केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या लोकांना तुमच्या घरी बोलावू नका - घरी पाहुणे येणे शुभ मानले जाते आणि येथे अतिथी देवो भवची परंपरा चालत आलेली आहे. पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही लोकांचे तुमच्या घरात येणे तुमच्या घरातील सुख-समृद्धी हिरावून घेते. त्यामुळे त्यांना घरी बोलावू नये.

स्वार्थी लोक - आचार्य चाणक्य म्हणतात की, स्वार्थी लोकांना कधीही घरात बोलावू नये. स्वार्थी लोक फक्त स्वतःचा विचार करतात आणि त्यांचे लक्ष फक्त तुमच्या घरी येऊन तुमचा फायदा घेण्यावर असते.
द्विमुखी व्यक्ती - आचार्य चाणक्य यांच्या मते, दुतोंडी असलेल्या लोकांना घरी बोलावू नये. द्विमुखी म्हणजे तुमच्या समोर एक गोष्ट बोलणे आणि पाठीमागे दुसरे बोलणे. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले आहे कारण ते नात्यात मतभेद आणि भांडणे करतात.
जे लोक दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतात - आचार्य चाणक्य सांगतात की, जे लोक इतरांना दुःखी पाहून आनंदी होतात त्यांना चुकूनही आपल्या घरी बोलावू नये. असे लोक इतरांना त्रास देऊन मनातून आनंदी होतात. अशा मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
कामापुरता मामा - चाणक्य नीतीनुसार, तुम्ही अशा लोकांना तुमच्या घरी बोलावू नये, जे तुमच्या गरजेच्या वेळी तुमची आठवण करतात. असे लोक क्षुद्र असतात आणि त्यांचा अर्थ पूर्ण झाल्यावर अदृश्य होतात.