Chaitanya Maharaj Wadekar : कीर्तनकार चैतन्य महाराज इतके लोकप्रिय का? 'ही' आहेत 5 गाजलेल्या कीर्तनाची लिस्ट
सध्या चर्चेत असलेले कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार तर आहेतच. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते युवकांचं तसेच जनतेचं प्रबोधन करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकीर्तनकार चैतन्य महाराज यांचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचं स्वत:चं इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेल आहे.
या चॅनेलमध्ये रिल्स आणि युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियातून तरुणाईला प्रेरणादायी सल्ला आणि उपदेश देण्याचं काम चैतन्य महाराज वाडेकर करतात.
याच निमित्ताने चैतन्य महाराज यांची आत्तापर्यंतची गाजलेली कीर्तनं जाणून घेऊयात.
त्यांचं खरा कृष्ण कोणाला कळाला...हे कीर्तन फार गाजलं आहे.
तसेच, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग फार गाजला आहे.
परमार्थाविषयीचं त्यांचं कीर्तन देखील प्रचंड गाजलं आहे.
सर्व सुखा अधिकारी मुखी उच्चारी हनिनाम हा तुकोबारायांचा अभंग देखील प्रसिद्ध झाला आहे.
चैतन्य महाराज वाडेकर यांची अशी काही कीर्तनं आहेत जी प्रचंड गाजली आहेत.
चैतन्य महाराज वाडेकर हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगतात. त्यांचे इतरही कीर्तन प्रसिद्ध आहेत.