BhauBeej 2025 : भाऊबीजेला बहीण भावाला टिळा का लावते? भाऊबीजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या
BhauBeej 2025 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा होणाऱ्या सणाला भाऊबीज म्हणतात. या दिवशी बहीण भावाला टिळा लावून आरती करतात.
Continues below advertisement
Bhaubeej 2025
Continues below advertisement
1/11
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. बहीण भावाला टिळा लावते आणि त्याच्या सुखासाठी प्रार्थना करते.
2/11
हिंदू धर्मात, रक्षाबंधनासारखाच भाऊबीज हा महत्त्वाचा सण आहे. यावर्षी तो गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाणार. या दिवशी बहीण भावाची टिळा लावून आरती करते.
3/11
या दिवशी भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. भाऊबीजेला भैयादूज, भाई टीका, यम द्वितीया आणि भातृ द्वितीया अशीही नावे आहेत. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते.
4/11
पौराणिक कथेनुसार, या दिवशी यमदेव आपली बहीण यमुनेच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते.
5/11
ज्योतिश शास्त्रानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8:16 वाजता सुरू होईल. 23 ऑक्टोबर रोजी रात्री 10:46 वाजता ती संपेल.
Continues below advertisement
6/11
भावाला टिळा लावण्याचा शुभ वेळ सकाळी 11:43 ते 12:28 आहे. दुपारी 1:13 ते 3:28 पर्यंत देखील शुभ वेळ आहे, त्यात 1:58 ते 2:43 सर्वोत्तम वेळ आहे. संध्याकाळी 5:43 ते 6:09 पर्यंतही शुभ वेळ आहे.
7/11
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जेवल्याने भावाचे आयुष्य वाढते असे मानले जाते. तसेच, या दिवशी यमुनेत स्नान करणेही शुभ मानले जाते.
8/11
हिंदू धर्मात सणांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक सण खास प्रथा आणि विधींसह साजरा केला जातो.
9/11
भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला टिळा लावतात. आरतीच्या ताटात शेंदूर, कुंकू, फुले, फळे, मिठाई आणि सुपारी ठेवतात. टिळा लावण्यापूर्वी तांदळाने चौरस बनवतात.
10/11
भावाला चौरंगावर बसवा. तसेच, भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर भावाला टिळा लावा. त्यानंतर फुले, सुपारी, मिठाई आणि काळे चणे अर्पण करा आणि ओवाळा. भाऊबीजेचा शेवट छानशी भेटवस्तू देऊन करा.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 22 Oct 2025 02:23 PM (IST)