Bada Mangal 2024 : आज सर्वात शेवटचा 'मोठा मंगळ'! हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टींचं करा दान, वर्षभर राहील बजरंगाची कृपा
आज ज्येष्ठ महिन्यातील सर्वात शेवटचा मोठा मंगळ आहे. या दिवशी भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी तसेच, आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी देशभरातून भक्त हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, आजच्या दिवशी लाल आणि भगव्या रंगांच्या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही गरजूंना लाल वस्त्र दान करू शकता. यामुळे तुम्हाला बजरंगबलीचा आशीर्वाद मिळेल.
असं म्हणतात की, यामुळे तुमच्या जीवनात राहिलेल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तसेच, रखडलेली कामेही पूर्ण होतील.
मोठा मंगळच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू सर्वसामान्यांना वाटा. तसेच, गरजूंना दान करा.
असं म्हणतात की, याच्या प्रभावाने व्यक्ती करिअरमध्ये चांगली उंची गाठू शकतो.
तसेच, आजच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मंगळाची स्थिती मजबूत होते.
बडा मंगळच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोकांच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो.
आजच्या दिवशी जर तुम्ही तूप दान केले तर व्यक्तीला सुख प्राप्त होते. दाम्पत्त्यांची अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.
आजच्या दिवशीचा शुभ मुहूर्त 8.53 पासून ते दुपारी 2.07 वाजेपर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )