Astrology : अवघ्या 2 दिवसांनी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन; तूळसह 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होईल भरभराट

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनुसार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. हा प्रभाव काही राशींसाठी शुभ असतो तर काही राशींसाठी अशुभ असतो.

Astrology

1/7
ज्योतिष शास्त्रानुसार, 27 ऑक्टोबर म्हणजेच अवघ्या दोन दिवसांनी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी शुक्र ग्रह विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा शुभ प्रभाव 5 राशींवर होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/7
शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभ मानलं जाणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.
3/7
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुम्हाला प्रमोशची संधी मिळू शकते.
4/7
शुक्र ग्रहाचं विशाखा नक्षत्रात प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना नवीन डील्स मिळू शकतात.
5/7
कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या संदर्भात शुभ वार्ता मिळू शकते. तसेच, तुमची थांबलेली कामे या कालावधीत पूर्ण होतील.
6/7
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळू शकते. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola