Astrology : घरात कण्हेरचं झाड लावणं शुभ की अशुभ? पिवळ्या फुलांचं आहे विशेष महत्त्व
हिंदू धर्ममान्यतेनुसार, कण्हेरचं फूल हे भगवान शिव आणि विष्णू यांना प्रिय आहे. तसेच, हे फूल सुख-शांतीचं देखील प्रतीक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळा असो वा पावसाळा किंवा अगदी उन्हाळा कण्हेरचं झाड नेहमीच सदाबहार असतं.
ज्योतिष शास्त्रानुसार, झाडा-झुडुपांत, रोपांत प्रत्येक देवतांचा वास असतो. यामध्येच काही झुडुपं अशी असतात ज्यांची नित्य नियमाने पूजा केली जाते. यामध्येच कण्हेरचं झाड एक आहे.
शास्त्रानुसार, कण्हेरचं झाड घरात लावणं शुभ मानलं जातं.
वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, कण्हेरचं झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. यामुळे पैशांचे मार्ग देखील खुले होतात. घरातील कलह दूर होतात.
अशीही मान्यता आहे की, भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना नियमित कण्हेरचं फूल अर्पण केल्याने आपल्या इच्छेनुसार आपल्याला फळ मिळतात.
कण्हेरचं फूल दिसायला जितकं सुंदर असतं त्याहून जास्त त्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत. आयुर्वेदात देखील या फुलाचं महत्त्व आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)