Astrology : प्रेम, सतर्कता की संकट? स्वप्नात कुत्र्याची झुंड दिसण्यामागचा अर्थ नेमका काय सांगतो? वाचा ज्योतिषशास्त्र
Astrology : अनेकदा लोकांना स्वप्नात कुत्र्यांची झुंड दिसते. हा एक प्रकारचा खास संकेत मानला जातो. यामागे नेमका अर्थ काय असतो ते जाणून घेऊयात.
Continues below advertisement
Astrology
Continues below advertisement
1/8
शास्त्रानुसार, स्वप्नात अनेकदा लोकांना कुत्रा (श्वान) दिसतो. याकडे अनेकदा लोक फारसं लक्ष देत नाहीत. मात्र, स्वप्नात कुत्रा दिसणं शुभ-अशुभ दोन्ही प्रकारचा संकेत असू शकतो. या ठिकाणी आपण स्वप्नात कुत्र्यांची झुंड दिसण्याचा अर्थ नेमका काय या संदर्भात जाणून घेणार आहोत.
2/8
स्वप्नात कुत्रा दिसणं शुभ किंवा अशुभ दोन्ही प्रकारे असू शकतं. मात्र, तुम्ही स्वप्नात कुत्र्याला कोणत्या प्रकारे पाहता यावर अवलंबून आहे. अनेकदा लोकांना स्वप्नात कुत्र्यांची झुंड दिसते. हा एक प्रकारचा खास संकेत मानला जातो. यामागे नेमका अर्थ काय असतो ते जाणून घेऊयात.
3/8
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात कुत्र्याची झुंड दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. हे स्वप्न तुमच्या आयुष्यात मैत्री, प्रामाणिकपणा, सुरक्षा या गोष्टींबाबत संघर्ष करण्याचा संकेत असू शकतो. स्वप्नात कुत्र्याची झुंड दिसणं तुमच्या आयुष्यात मजबूत नाती आणि सामाजिक संबंधांची गरज अधोरेखित करते.
4/8
स्वप्नात कुत्र्याची झुंड दिसण्याचा अर्थ असा आहे की, हे स्वप्न तुमच्या आयुष्यात सुरक्षेची भावना प्रदान करते. या स्वप्नामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांप्रती सुरक्षिततेची भावना अधोरेखित करता.
5/8
स्वप्न शास्त्रानुसार, कुत्र्यांची झुंड स्वप्नात कधी कधी हिंसक आणि आक्रमकतेचा देखील संकेत देऊ शकतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सतर्क राहण्याची गरज आहे.
Continues below advertisement
6/8
स्वप्नात कुत्र्यांची झुंड दिसणं म्हणजेच तुमच्या कुटुंबावर आणि नातेसंबंधांवर लक्ष देण्याची गरज देखील अधोरेखित करतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कुटुंबियांबरोबर जास्त वेळ घालवण्याची गरज आहे.
7/8
जर तुम्ही स्वप्नात एक दोन नाही तर अनेक काळे कुत्रे पाहिले असतील किंवा स्वप्नात कुत्री भुंकताना दिसली असतील तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. याचा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. असा संकेत अधोरेखित करतो.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Aug 2025 03:07 PM (IST)