Astrology : मेष आक्रमक तर, सिंह तत्ववादी; राशींनुसार व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा? राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात...

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत. या बारा राशींचे वेगवेगळे स्वभाव आहेत.

Continues below advertisement

Astrology

Continues below advertisement
1/13
कुंभ रास - कुंभ राशीचे लोक फार परिपक्व असतात. हे लोक स्वभावाने तितकेच सामंजस आणि समजूतदार असतात. यांना आपली जबाबदारी पूर्णपणे सांभाळता येते.
2/13
मेष रास - 12 राशींमध्ये ही सर्वात पहिली रास आहे. या राशीचे लोक फार आक्रमक स्वभावाचे असतात. तसेच, प्रचंड मेहनती आणि हट्टी स्वभावाचे असतात.
3/13
वृषभ रास - वृषभ राशीचे लोक रोमॅंटिंक असतात. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हे सहज इतरांच्या प्रेमात पडतात.
4/13
मिथुन रास - मिथुन राशीचे लोक फार मिश्कील स्वभावाचे असतात. अनेकदा यांचा चिडचिडा स्वभाव, हट्टीपणा इतरांसाठी नकारात्मक ठरु शकतो.
5/13
कर्क रास - कर्क राशीचे लोक फार प्रेमळ स्वभावाचे असतात. कोणी यांच्याशी कितीही वाईट वागू देत पण आपला चांगुलपणा हे सोडत नाहीत.
Continues below advertisement
6/13
सिंह रास - या राशीचे लोक प्रचंड तत्ववादी असतात. हे लोक कधीच आपल्या मतांशी, विचारांशी तडजोड करत नाहीत.
7/13
कन्या रास - कन्या राशीचे लोक फार चिकित्सक स्वभावाचे असतात. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता हे लोक कोणाच्या जवळही जात नाहीत.
8/13
तूळ रास - ज्याप्रमाणे या राशीचं चिन्ह आहे. त्याप्रमाणेच तूळ राशीचे लोक फार समतोल विचाराचे असतात. कोणत्याही गोष्टीचा ते दोन्ही बाजूंनी विचार करतात.
9/13
वृश्चिक रास - या राशीचे लोक चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट असतात. जर कोणी यांच्या मनाविरुद्ध वागलं तर वेळीच हे डंकदेखील मारतात.
10/13
धनु रास - धनु राशीचे लोक आपल्या मनाचे राजे असतात. हे लोक अत्यंत मूडी स्वभावाचे असतात.
11/13
मकर रास - मकर रास ही मूळातच शनीची रास आहे. या राशीचे लोक फार सहनशील असतात.
12/13
मीन रास - मीन राशीचे लोक फार भाविक असतात. हे लोक भक्तीत फार तल्लीन होतात. तसेच, फार श्रद्धाळू लोक असतात.
13/13
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola