चुकीच्या दिशेला घड्याळ लावलंत, तर तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरतील; घरात लक्ष्मी नाराज होऊन, गरिबी आश्रय घेईल!
घड्याळ योग्य दिशेला लावणंही तितकंच महत्त्वाचं असत. पण जर तुम्ही घड्याळ चुकीच्या दिशेला लावलं, तर मात्र तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू शकतात. घरातील सगळी सुख-शांती नष्ट होऊन, घरात गरिबी राज्य करू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तुशास्त्रानुसार, घरात योग्य दिशेला घड्याळ लावणं महत्त्वाचं असतं.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घड्याळ चुकीच्या दिशेला लावलं, तर तुमच्या आयुष्याचे काटे उलटे फिरू शकतात.
घड्याळ कधीही पश्चिम दिशेला लावू नये, असं वास्तूशास्त्र सांगतं.
पश्चिम दिशेला घड्याळ लावणं वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं.
जर तुम्ही पश्चिम दिशेला भिंत घड्याळ लावलं तर, ते आर्थिक समस्यांसह जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतं.
पश्चिम दिशेला असलेलं घड्याळ तुमचं भाग्य पटलवू शकतं. घरातील सर्व आर्थिक सुबत्ता नष्ट होऊन, घरात गरिबी वास्तव्य करू शकते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेल्या भिंतीवर घड्याळ लावणं नेहमीच उत्तम मानलं जातं.
वास्तूशास्त्रानुसार, घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये. तसेच, बेडच्या जवळ किंवा वरही घड्याळ लावू नये.
बंद घड्याळ कधीही घरात ठेवू नये, असं करणं अशुभ मानलं जातं, असंही वास्तुशास्त्र सांगतं.
वास्तुशास्त्रानुसार घड्याळ बंद पडल्यास ते काढून दुरुस्त करावं किंवा नवं घड्याळ बसवावं.
(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)