Astro Tips : पूजा करताना तुम्हालाही झोप किंवा आळस येतो? वाचा शास्त्रात काय म्हटलंय...
असं म्हणतात की, जर तुमचं मन स्थिर असेल तर तुम्ही देवाशी कनेक्ट करु शकता. पण, अनेकदा पूजा करताना आपलं मन विचलित असते किंवा अन्य गोष्टींचा विचार मनात सुरु असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, तुम्हाला माहितत आहे का शास्त्रात या सर्व गोष्टींचा वेगवेगळा अर्थ सांगण्यात आला आहे.
जर पूजा करताना तुम्हाला झोप किंवा आळस येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचं मन पूर्णपणे देवाशी जोडलं गेलं नाहीये.
तसेच, जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेले असाल तर तुम्हाला पूजा करताना झोप येईल.
शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला पूजा करताना झोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती पूर्णपणे देवाशी समर्पित नाही. एकाग्रता कमी आहे.
याचा सकारात्मक संकेतही देण्यात आला आहे तो म्हणजे जर पूजा करताना तुम्हाला झोप येत असेल तर हा तुमच्या आत्म्याच्या शांतीचा संकेत देखील असू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)