Astro Tips : तोंडात वारंवार थुंकी येणं म्हणजे... धोक्याची घंटा; जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार याचा अर्थ

तोंडात लाळ येणं सामान्य गोष्ट आहे. पण, वारंवार तोंडात जर थुंक येत असेल तर याचा संबंध ज्योतिष शास्त्राशी संबंधित आहे. याचं कारण नेमकं काय ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहाच्या अशुभ परिणामामुळे तोंडात वारंवार थुंक येते.

सूर्याची स्थिती जेव्हा कुंडलीत कमजोर असते तेव्हा व्यक्तीला वारंवार थुंक येते. मान्यतेनुसार, या सवयीमुळे त्यांच्या मान-प्रतिष्ठेवरही वाईट परिणाम होऊ लागतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत सूर्याचं राहू किंवा शनीबरोबर असणं शुभ मानलं जात नाही. तोंडात वारंवार थुंक येणे हे दारिद्र्याचं लक्षण ठरतं. त्यामुळे अशा वेळी सूर्याशी संबंधित उपाय करावा.
कुंडलीत सूर्याचं स्थान मजबूत करण्यासाठी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा. तसेच, रविवारी वाहत्या पाण्यात गूळ आणि तांबे सोडा.
तसेच, वडिलांचा आदर करा. भगवान विष्णूची पूजा करा. शक्य असल्यास रविवारच्या दिवशी उपवास करा. यामुळे सूर्य देवाचा आशीर्वाद मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)