Ashadhi Wari 2025 : आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई; पाहा PHOTO

Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या सोहळ्याला सुरुवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होतेय.

Ashadhi Wari 2025

1/9
आषाढीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने अवघा परिसर विविध रंगांनी न्हाऊन निघाला आहे.
2/9
आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरची वाट चालत असताना मंदिर समितीने विठ्ठल मंदिर, सात मजली दर्शन मंडप,तुकाराम भवन नामदेव पायरी,पश्चिम दरवाजा,व्हीआयपी गेट अशा सर्व ठिकाणी अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे.
3/9
यासोबत विठ्ठल मंदिरात सभा मंडपातही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
4/9
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या सोहळ्याला सुरुवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे.
5/9
मंदिर परिसर आणि दर्शनरांग गजबजली आहे. आषाढी सोहळ्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या आणि दिंडया श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
6/9
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत.
7/9
रात्रीची ही दृष्य डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत.
8/9
सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर करण्यात आली आहे.
9/9
यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट आणि वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत.
Sponsored Links by Taboola