Ashadhi Wari 2025 : पालख्या पुढे येऊ लागल्या! पंढरपुरात दर्शनाला तुफान गर्दी, लाखोंच्या संख्येने भाविक रांगेत उभे, पाहा PHOTO

Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रा काळात दर्शनाला तासनतास थांबावे लागत असल्याने अनेक भाविक सध्या पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत.

Continues below advertisement

Ashadhi Wari 2025

Continues below advertisement
1/8
आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले सात मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्या तशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.
2/8
काल देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले असताना देवाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेली असून दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत.
3/8
आषाढी यात्रा काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने झटपट दर्शनासाठी सुरू केलेले टोकन दर्शन व्यवस्था यात्रा कालावधीपर्यंत बंद करण्यात आलेली आहे.
4/8
यात्रा काळात दर्शनाला तासनतास थांबावे लागत असल्याने अनेक भाविक सध्या पालखी सोहळ्यातून पुढे येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत.
5/8
यामुळेच जरी आषाढी एकादशी 6जुलैला असली तरी विठ्ठलाच्या दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक थांबलेले दिसत आहेत.
Continues below advertisement
6/8
प्रशासनाने या ठिकाणी भाविकांना विशाल वॉटरप्रूफ मंडप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह उभारलेले असल्याने भाविकांना दर्शन रांगेत थांबणे सुसह्य होत आहे.
7/8
यासोबत भाविकांच्या निवासासाठी असणाऱ्या 65 एकर येथील भक्ती सागर या निवास स्थळावर आगाऊ जागेच्या बुकिंगसाठी ही विविध दिंडी यांची प्रतिनिधी पुढे आलेली आहेत.
8/8
मंडळी ही आधीच विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या दिंडीत आणि पालखी सोहळ्यात परत जात आहेत.
Sponsored Links by Taboola