Ashadhi Wari 2024 : ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषाने नेवासानगरी दुमदुमली; पैस खांबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाच्या दर्शनासाठी नेवासा येथे भाविकांनी अलोट गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पैसचे मंदिरासह मंदिराचे निर्माते वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरात केलेली आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरतेय.
आषाढी वद्य एकादशीमुळे शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिराकडे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातून शेकडो पायी दिंडया देखील दाखल झाल्या आहेत.
माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहाटेपासून साबुदाणा खिचडी, पाणी बॉटल, उकडलेले शेंगदाणे, चहा, दूध, केळी फराळी चिवड्याचे वाटप केले जात आहे.