Ashadhi Wari 2024 : यळकोट यळकोट जय मल्हार.... माऊली महाराजांच्या पालखीचं भंडारा आणि फुलं उधळून जल्लोषात स्वागत; ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य
आषाढ महिना जसजसा जवळ येतोय तसतशी विठोबाच्या भेटीची ओढ लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणांहून पालख्या पंढरीत जाण्यासाठी दाखल होतायत.
अवघड दिवे घाट ओलांडून संत श्रेष्ठ माऊली महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवस सासवड मुक्कामी होता.
त्यानंतर माऊली महाराजांच्या पालखीने जेजुरीत आगमन केलं आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णवांचा मिलाप झाल्याचा पाहायला मिळतो.
एकीकडे या आषाढी वारीमध्ये टाळ मृदुंगाचा जयघोष तर दुसरीकडे जेजुरीमध्ये वाघ्या मुरळीचा घोळ आपल्याला जेजुरीमध्ये अनुभवायला मिळतो.
या ठिकाणी महाराजांची पालखीचं आगमन झाल्यानंतर वारकऱ्यांनी भंडारा आणि फुलं उधळून जोरदार स्वागत केलं आहे.
याचीच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ही दृश्य टिपलेली आहेत.