April Grah Gochar 2025 : एप्रिल महिन्यात लागोपाठ 4 ग्रह बदलणार चाल; पण फक्त 'ही' रास ठरणार लकी!

April Grah Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. एप्रिल महिन्यात देखील ग्रहांचं संक्रमण होणार आहे, यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊ.

April Grah Gochar 2025

1/7
3 एप्रिल 2025 रोजी रात्री 1 वाजून 56 मिनिटांनी मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रह साहस, ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो.
2/7
बुध ग्रह 7 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजून 36 मिनिटांनी मार्गी होणार आहे. आता बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या मार्गी असण्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील.
3/7
13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी शुक्र ग्रह मार्गी होणार आहे. शुक्र ग्रह मीन राशीत स्थित आहे. शुक्र ग्रहाला धन, वैभव, सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह मानतात.
4/7
14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी सूर्य ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी खरमास संपणार आहे.
5/7
सूर्याचं संक्रमण वृषभ राशीच्या बाराव्या चरणात होणार आहे. या दरम्यान शुक्राची स्थिती फार अनुकूल असणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल.
6/7
या दरम्यान तूळ राशीच्या करिअर आणि व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola