Anganewadi Jatra 2026 : कोकणात भक्तीचा महापूर; आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेला आजपासून प्रारंभ
आंगणेवाडीतील नवसाला पावणाऱ्या भराडी देवीची जत्रा आजपासून, लाखो भाविक कोकणात दाखल! जत्रेचं वैशिष्ट्य जाणून घ्या...

Anganewadi Jatra 2026 Bharadi Devis fair in Anganwadi starts today devotees arrive in Konkan
1/7
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या भराडी देवीच्या आंगणेवाडी जत्रेला आज 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झालीयं.
2/7
येथील खास वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसून देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित होतो. या जत्रेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात...
3/7
ही यात्रा दीड दिवसांची असून अनेक राजकीय नेत्यांसह लाखो भाविक यात्रेस उपस्थित असतात. ही देवी भरडावर प्रकट झाल्यामुळं देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं.
4/7
भराड म्हणजे माळरान आजूबाजूचा परिसर हा माळरान असल्यानं या देवीला 'भराडी देवी' असं नाव पडलं. ही देवी केवळ आंगणे कुटुंबियांची असल्याचं सांगण्यात येतं.
5/7
आंगणे कुटुंबियांचं खाजगी मंदिर म्हणून तेथे तसा फलकही लावण्यात आलायं. मात्र, नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यानं देवीचं दर्शन सर्वांसाठी खुलं असतं. यावेळी गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.
6/7
यात्रेत धार्मिक महत्त्वासोबतच सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात तसेच दशावतारही असतो.
7/7
तुम्हाला जर आंगणेवाडी जत्रेला जायचं असेल तर कणकवली, कुडाळ रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध असून, या दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासानं बसेस असतात.
Published at : 09 Feb 2026 03:46 PM (IST)