Ahmednagar News : नूतनीकरणाच्या कामामुळे 4 ऑगस्टपर्यंत शनी चौथाऱ्यावरील दर्शनास प्रतिबंध; मंदिर देवस्थानाकडून माहिती समोर

Ahmednagar News : शनी देवाच्या चौथाऱ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यास बंदी घातली आहे.

Ahmednagar News

1/7
शनिशिंगणापूर येथील शनी चौथाऱ्यावरील दर्शन काही दिवसांसाठी बंद असणार आहे.
2/7
शनी देवाच्या चौथाऱ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने चौथाऱ्यावर जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यास बंदी घातली आहे.
3/7
तरी, 4 ऑगस्टपर्यंत हे काम सुरु असल्या कारणाने शनी चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी करण्यात आली आहे.
4/7
तरी, केवळ चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी शनी चौथऱ्यासमोरून दर्शन नियमित सुरू राहणार असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
5/7
काही दिवसांपूर्वीच विश्वस्त मंडळातील पदाधिकारी आप्पासाहेब शेटे यांनी स्पष्ट केलं होतं की, प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अजून सात ते आठ दिवस लागू शकतात,त्याच्या आधी देखील काम सुरू करण्याची वेळ आली तर तशा सूचना देवस्थानाकडून दिल्या जातील.
6/7
नव्या चौथऱ्याची उत्सुकता असलेल्या जगभरातील शनिभक्तांना जुलै महिन्यात नवा चौथरा दृष्टीस पडण्याची शक्यता आहे.
7/7
दरम्यान, चौथऱ्याचे काम महिनाभर चालण्याची शक्यता असल्याने त्या काळात चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे.
Sponsored Links by Taboola