Photo: बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत
बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Buldana News
1/10
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकरी धास्तावलेत. कारण या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
2/10
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
3/10
मध्यरात्रीनंतर बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं बळीराजा (Farmers) मात्र धास्तावला आहे. कारण या पावसामुळं हातातोंडाशी आलेली पीकं वाया जाण्याच शक्यता निर्माण झाली आहे.
4/10
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. विशेषत: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
5/10
या पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
6/10
रात्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात विजासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
7/10
काल (4 जानेवारी 2023) भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून तिथे ढगाळ वातावरण होते.
8/10
ढगाळ हवामानाचा जिल्ह्यातील तूर आणि पालेभाज्यांना पिकांना मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळं तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
9/10
अवकाळी पावसाच्या हजेरीने पालेभाजी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
10/10
राज्यात गारठा वाढला असताना काही भागात मात्र, पावसानं हजेरी लावली आहे. सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे.
Published at : 05 Jan 2023 07:37 AM (IST)