हिंगोलीच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, खेकडा पालनातून वर्षाला घेतोय 6 लाखांचे उत्पन्न
हिंगोलीतील शेतकऱ्याला youtube वरून खेकडा पालनाची संकल्पना सुचली, शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या खेकडा पालनातून लाखोंचा फायदा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appyoutube वरून खेकडा पालनाची माहिती घेत हिंगोली जिल्ह्यातील बाबूळगाव येथील शेतकरी भारत जहराव यांनी स्वतःच्या शेतामध्ये वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल शेत तळे केलं.
त्यात खेकडे पालन सुरू केलं. यावर्षी त्यांना सहा लाख रुपये उत्पादन मिळाले आहे.
डोंगराळ भागातील पाच एकर शेतीचे मालक असलेले भारत जहरव डोंगराळ यांनी ही कमाल केली आहे.
डोंगराळ भागात शेती असल्याने संसाराचा गाडा चालवा आस काही उत्पन्न सुद्धा होत नाही म्हणून शेती कशी करावी आसा प्रश्न जहरव यांच्या समोर उभा राहिला होता.
यूट्यूबवर भरत यांनी खेकडा पालनाचा व्हिडीओ पहिला आणि पाहताच क्षणी हा उपक्रम आपणही राबवायचा ठरवले.
स्वतः च्या शेतात 20*50 फूट आणि 8 फूट खोल असे शेततळे खोदून त्या शेत तळ्याचे काँक्रिटच्या माध्यमातून बांधकाम करण्यात आले.
बांधकाम करण्यात आलेल्या शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकली, त्यानंतर बीज रुपात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले. एक वर्ष हे खेकडे जोपासण्यात आले.
खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून ही काळजी घेतली जाते.
फक्त 9 महिन्यात विक्री लायक खेकडे तयार झाले आहेत. जवळपास 12 क्विंटल हून अधिक खेकडे या शेत तळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठे असल्याने मागणी जास्त असते. 500 रुपये दर किलो प्रमाणे ह्या खेकड्याची विक्री होत आहे. यातून फक्त 9 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले.