मशरुमची शेती करा, महिन्याला लाखो रुपये मिळवा
बिहारमधील (Bihar) एका शेतकऱ्याने देखील एक असाच वेगळा प्रयोग केला आहे. या शेतकऱ्यानं मशरुम शेतीचा (mushroom farming) यशस्वी प्रयोग केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही यशोगाथा आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. बिहारच्या पूर्णिया येथील शेतकरी राजकुमार यादव यांनी आपल्या कल्पनेवर कठोर परिश्रम करून लाखो रुपये कमाई केली आहे.
राजकुमार यांनी आपल्या शेतात मशरुमच्या अनेक जातींचा प्रयोग केला आहे. यातून त्यांना भरपूर नफाही मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत लहान शहरे आणि ग्रामीण भागात मशरूमच्या गुणधर्मांबद्दल जागरूकता वाढली आहे.
आता पौष्टिक भाजी म्हणून लोकांच्या ताटात तिने आपले स्थान निर्माण केले आहे.
नेक दिवसांपासून मशरूमची लागवड करण्याची इच्छा होती. परंतु, माहितीअभावी आम्ही ते सुरू करू शकलो नाही. त्यानंतर त्यांनी मुंबईतून याबाबत माहिती गोळा केली. सर्व गुंतागुंत समजून घेतल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली.
राजकुमार सध्या मशरूमच्या सुमारे सहा जातींचे उत्पादन घेत आहेत. याद्वारे ते दरमहा एक लाख रुपयांहून अधिक सहज कमावतात
मशरूमची मागणी वाढत आहे. त्यांच्याकडे ऑयस्टर, गुलाबी, लोणी, काजू, पिवळे आणि काळ्या प्रकारचे मशरूम उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 200 ते 2000 रुपये प्रति किलो आहे.
मशरुमची शेती करण्यासाठी राजकुमार यांनी खूप मेहनत घेतली. दुचाकीवरून रस्त्यांवर फिरून त्यांनी त्याचा प्रचार केला.