Washim : वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसात लाखोंचा नफा
वाशिमच्या एका शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची (Kharbuj) लागवड केली आहे. 82 दिवसाच्या खरबूज पिकानं मंत्री यांना लखपती केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराधेश्याम मंत्री (Radheshyam Mintri) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी यशस्वी खरबूज शेती केली आहे.
वाशीमच्या राधेश्याम मंत्री यांची तामसी शिवारात शेतजमीन आहे. मंत्री गेल्या अनेक वर्षापासून शेतीत विविध प्रयोग करतात.
हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यातून त्यांना थेट शेतातून 17 रुपये प्रतिकिलो एवढा दर जागेवरच मिळतोय.
मंत्री यांनी स्थानिक बाजारात विक्री केली असती तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता
आपल्या पिकाची विक्री इतर राज्यातील व्यापारी खरेदी करु शकतात याचा अचूक अंदाज घेत त्यांनी कश्मीर निवडले आणि याचा फायदाही मिळाला.
मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण 20 टनांचे खरबूज निघाले आहे. तर आणखी 17 ते 18 टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. ज्यातून त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न होणार आहे.
50 हजारांचा खर्च वजा जाता मंत्री यांना एकरी दोन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. वाशीमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.
राधेश्याम मंत्री हे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करत आहेत. त्यासाठी त्यांना 2018 साली महाराष्ट्र सरकारचा सेंद्रिय शेती भूषण पुरस्कारही मिळाला आहे.
पारंपरिक पिकांना बगल, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करावी असे आवाहन मंत्री यांनी केले आहे.