Lemon : देशातील सहा राज्यात लिंबाचे 70 टक्के उत्पादन
भारतातील काही राज्यांमध्ये लिंबाचे (Lemon) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील 70 टक्के लिंबाचं उत्पादन हे सहा राज्यांमध्ये होतं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं (National Fruit Production Board) दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशनंतर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो.
लिंबाचे सेवन करणं निरोगी राहण्यासाठी खूप चांगले मानले जाते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते.
पारंपारिक शेतीपेक्षा लिंबू बागायती हा उत्तम पर्याय म्हणून शेतकरी आता विचार करु लागले आहेत. लिंबू हे असे फळ आहे, जे अन्नात वापरले जाते.
आंबट चवीसाठी लोक अनेक पदार्थांमध्ये लिंबू घालतात. यासोबतच लोणचे बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. शीतपेयांमध्ये देखील लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सध्याच्या काळात लिंबू हे एक उपयुक्त फळ बनले आहे. अन्नाव्यतिरिक्त, अनेक कॉस्मेटिक कंपन्या आणि फार्मास्युटिकल कंपन्या लिंबाचा वापर करतात.
लिंबू उत्पादनात आंध्र प्रदेश देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. येथील हवामान आणि माती लिंबू लागवडीसाठी अनुकूल आहे. त्यामुळं आंध्र प्रदेशात लिंबाचे सर्वाधिक उत्पादन होते.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण लिंबाच्या उत्पादनापैकी 19.73 टक्के उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होते.
महाराष्ट्रात 9.85 टक्के लिंबाचे उत्पादन होते. त्यानंतर कर्नाटकमध्ये 9.68 टक्के, त्यानंतर 8.61 टक्के उत्पादन मध्य प्रदेशात होते. याशिवाय, इतर राज्यात उर्वरित 30 टक्के लिंबाचे उत्पादन घेतलं जातं.