Sangli Grapes : निर्यातक्षम द्राक्षाला प्रतिकिलो 60 ते 70 रुपयांचा दर, भाव घसरल्याने सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत
सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीला गती आली आहे, मात्र निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशवंत माल असल्याने द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत.
25 ते 30 रुपये प्रति किला इतका कमी दर द्राक्षाला मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमागील दराच्या घसरणीचे शुक्लकाष्ट संपत नाही.
दरवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
मार्च महिन्यात तरी भाव वाढतील, अशी आशा असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या तरी निराश दिसत आहे.
मागील दोन वर्षे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खर्च अधिक आणि उत्पादन शून्य झाले. यावर्षी सुद्धा 'येरे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत स्थानिक बाजारपेठाअंतर्गत चांगल्या द्राक्षाला प्रति किलो 25 ते 30 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेअंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलो 60 ते 70 रुपये इतकाच भाव मिळत आहे.
त्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न हे खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती आहे.