Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले असून लासलगाव बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढवून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे
शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून या आंदोलनात कांदा उत्पादक संघटना, प्रहार शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वीच संतप्त शेतकऱ्यांशी आमदार छगन भुजबळांनी संवाद साधला आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार असल्याचं आश्वासन भुजबळांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही आंदोलन शेतकऱ्यांशी संवाद साधला असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार करत निर्यात शुल्क रद्द करण्यासंबंधी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
कांद्यावरील 20% निर्यात शुल्कर रद्द करावे, नाफेड ने कांदा खरेदी बाजार समितीत येऊन करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
शेतकरी अजूनही आंदोलनावर ठाम असून देशातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले आहेत.