Photo : नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ
नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मिरचीला आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीला सध्या सहा हजार रुपयापासून 12 हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.
नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक होते.
मिरचीच्या दरात मागच्या वर्षाचा विचार केला तर दुप्पट दरवाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे.
नंदूरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा आहे. नंदूरबार बाजार समिती मोठी बाजारपेठ आहे.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही मिरचीच्या उत्पादनात घट होणार आहे.
पावासाचा लाल मिरचीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादन घट झाली आहे.
सध्या नंदूरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मिरचीला आतापर्यंतचा सर्वाधिक दर मिळत आहे.
लाल मिरचीला विक्रमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणात पिकं शिल्लक नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांडे मिरची आहे, त्यांना चांगला फायदा होत आहे.