Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : देशात गव्हाची विक्रमी लागवड, तेलबियांच्या पेरणीतही वाढ
यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशाच्या विविध भागात यंदा गहू लागवडीत वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षीही देशात अन्नधान्याचे (Grain) मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची (Agriculture Crop) लागवड यावर्षी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गव्हाच्या लागवडीच्या (Wheat Cultivation) संदर्भातील आकडेवारीची माहिती दिली आहे.
देशात यावर्षी गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं अन्नधान्याचं कोणतेही संकट येणार नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. गव्हाची विक्रमी लागवड ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे.
यंदा गव्हाखालील क्षेत्र गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक आहे. यावर्षी 3.32 कोटी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली आहे.
गतवर्षी गव्हाच्या लागवडीची स्थिती फारशी चांगली नव्हती. क्षेत्रफळही कमी होते. त्याचबरोबर उत्पन्नाच्या बाबतीतही गतवर्षी विशेष काही वाढ दिसली नाही. अति उष्णतेचा गव्हाच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता.
देशात बटाटा आणि गव्हाची पेरणी अजूनही सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बटाट्याची आणि गव्हाची पेरणी सुरू आहे.
गेल्या वर्षी गव्हाच्या उत्पादनाचे निश्चित उद्दिष्ट 112 दशलक्ष टन ठेवण्यात आले होते. यंदा निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या पेरणीवरही लक्ष ठेवून आहे. चालू हंगामात 1.58 कोटी हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी 97.66 लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली होती. यंदा हा आकडा वाढून 1.05 कोटी हेक्टर झाला आहे.
यावर्षी कडधान्य, तेलबियांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.