पीएम सूर्य घर योजना: सूर्योदय योजनेद्वारे मोफत विजेसह रोजगाराची संधी.
पीएम सूर्योदय योजना: केंद्र सरकारच्या सूर्योदय योजनेचा लाभ घेऊन देशभरातील करोडो कुटुंबांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. यासोबतच लोकांना कमाईची संधीही मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी मोफत सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. केंद्र सरकार या योजनेत एकूण 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशभरातील १ कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
या योजनेद्वारे लाभार्थ्यांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते.याशिवाय निर्माण होणारी वीज विकून तुम्ही वार्षिक 17 ते 18 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता.
या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही नोंदणी करू शकता. ऑफलाइन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी नोंदणी करू शकता.
याशिवाय, तुम्ही https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.