PM Kisan Samman Nidhi Yojana : या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 16 व्या हप्त्यातून 2000 रुपये मिळणार नाहीत,जाणून घ्या कारण
पीएम किसान सन्मान (पीएम किसान योजना) चा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळजिल्ह्यातून हस्तांतरित करणार आहेत.ज्यामध्ये हा हप्ता डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.(Photo Credit : Pexel.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार फायदा पीएम किसान योजनेद्वारे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ₹6000 ची आर्थिक मदत दिली जात आहे, (Photo Credit : Pexel.com)
ज्यामुळे आतापर्यंत ₹ 2.81 लाख कोटी 11 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता जारी करतील. (Photo Credit : Pexel.com)
या अंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे.(Photo Credit : Pexel.com)
पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक करणे आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे.(Photo Credit : Pexel.com)
ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा केला जाणार नाही. म्हणजेच 16 व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.(Photo Credit : Pexel.com)
पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी http://pmkisan.gov.in ला भेट द्या.(Photo Credit : Pexel.com)