Agriculture : भातासह ऊस लागवडीत वाढ तर तेलबिया, कापूस लागवडीत घट
देशात यावर्षी भात लागवडीच्या (Paddy sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआत्तापर्यंत देशात 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 312.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.
भात लागवडीत वाढ झाल्यामुळं तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशात भाताच्या लागवडीत वाढ झाली आहे.
कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कापसाच्या लावडीत घट झाली आहे.
आत्तापर्यंत 121.28 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत कापसाच 122.53 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती
या खरीप हंगामता ऊसाच्या लागवड क्षेत्रात थोडी वाढ झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
आत्तापर्यंत 56.06 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. मागील वर्षीचा विचार केला तर याच कालवधीत 55.20 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती.
खरीप पिकांचे लागवडीचे एकूण क्षेत्र हे 979.88 लाख हेक्टरवर गेले आहे. जे मागील वर्षी 972.58 लाख हेक्टर होते.