Onion : कांद्याचे भाव उतरल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; आवक वाढत असल्यानं कांद्याचे दर गडगडले
Onion Rate Issue Onion
1/9
Onion Rate Issue : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याने बळीराजाच्या हाती काही मिळत नाही.
2/9
पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
3/9
पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले.
4/9
गेल्या पाच वर्षांनंतर पुन्हा कांदा 100 रुपये क्विंटलवर आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले
5/9
गत पंधरा दिवसांपासून आवक सतत वाढत असून वाढत्या आवक झाल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. पैठण बाजार समितीत इतर ठिकाणांहूनदेखील कांद्याची आवक सुरू आहे.
6/9
कांद्याला तीन दिवसांपूर्वी 200 ते 900 रुपये भाव मिळाला होता. मात्र सततची वाढती आवक यामुळे कांद्याला 240 वरून थेट दोन दिवसांत 100 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.
7/9
पैठण बाजार समितीमध्ये पैठण तालुक्यातील व इतर ठिकाणांहून देखील आवक होत आहे.
8/9
कांद्याला तीन दिवसांपूर्वी 200 रुपये ते 900 रुपयांचा भाव मिळाला होता. आज मात्र कांद्याला शंभर रुपये क्विंटलची लिलावात बोली लागली. हा भाव म्हणजे 1 रुपये किलोप्रमाणे कांदा गेला. यात कांद्याच्या लागवडीसाठी जो पैसा लागला तोही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
9/9
शुक्रवारी पैठण तालुक्यातून अडीच हजार कांद्याच्या गोण्या लिलावासाठी बाजार समितीत आल्या.
Published at : 18 Apr 2022 11:58 AM (IST)