Photo : रंगीत फ्लॉवर कोबी पाहिलात का?
राज्यातील शेतकरी सातत्याने शेतीत नव नवीन प्रयोग करत असतात. वेगवेगळ्या पिकांची लागवड करुन उत्पादन घेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसाच एक वेगळा प्रयोग नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. आतापर्यंत आपण पांढऱ्या रंगाची फ्लॉवर कोबी सातत्याने बाजार विकत घेत होतो किंवा पाहिली असेल.
मात्र, आता बाजारात आपल्याला रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाची फ्लॉवर कोबीसुध्दा पाहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासोळ गावच्या हेमंत देसाई या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात ही रंगीत फ्लॉवर कोबी फुलवली आहे. या रंगीत फ्लॉवर कोबीच्या शेतीतून ते चांगले उत्पादन देखील मिळवत आहेत.
रंगीत जांभळ्या, पिवळ्या रंगाच्या कोबीचे वैशिष्ट्य म्हणजे या कोबीत व्हिटॅमीन 'ए' चे प्रमाण आहे. व्हिटॅमीन ए असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत आहे. त्यात अधिक पोषकतत्वे असल्याने शहरी भागात या फ्लॉवर कोबीला मोठी मागणी आहे.
मुंबईच्या वाशी आणि गुजरातमधील वापी मार्केटमध्ये ही कोबी साधारण 30 रुपये किलोने विक्री केली जाते. आतापर्यंत या रंगीत कोबीच्या विक्रीतून चांगला फायदा झाल्याची माहिती शेतकरी हेमंत देसाई यांनी दिली आहे.
दरम्यान, 20 गुंठ्यात रंगीत कोबीचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी साधारणत 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च आला आहे. आत्तापर्यंत 4 टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. अजून दोन ते सव्वा दोन टनापर्यंतचे उत्पन्न निघेल अशी आशा आहे.
लोकांची या रंगीत कोबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पुढे यासाठी चांगले दिवस येणार असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. राज्यातील वाशी मार्केटमध्ये या रंगीत कोबीला जास्त मागणी होत आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील या कोबीला मागणी वाढत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गुजराच्या वापी मार्केटमध्ये या कोबीला मागणी आहे.