Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
या अपघातात चार शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Continues below advertisement
Nanded
Continues below advertisement
1/5
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या आष्टी गावाच्या शिवारात हळद शिजवताना प्रेशर कुकरचा भीषण स्फोट होऊन चार शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2/5
आष्टी शिवारातील काही शेतकरी हळदीची प्रक्रिया करण्यासाठी शेतातच प्रेशर कुकरचा वापर करून हळद शिजवत होते. शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक कुकरचा स्फोट झाला.
3/5
स्फोट इतका जबरदस्त होता की कुकरचे तुकडे तब्बल 600 फूटांपर्यंत उडून गेले. या अपघातात चार शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
4/5
सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हळद शिजवताना वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या कुकरमध्ये जास्त दाब तयार झाल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
5/5
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी हळद शिजवताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
Continues below advertisement
Published at : 25 Mar 2025 06:50 PM (IST)