2022 मध्ये मदर डेअरीच्या दूध दरात पाच वेळा वाढ
वर्षभरात 'मदर डेअरी'नं पाच वेळा दूध दरात वाढ केली आहे. तर गेल्या दीड वर्षात सहा वेळा दुधाच्या दरात वाढ केली आहे, सध्या मदर डेअरीचे दूध हे 66 रुपये लिटरने मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्षभरात अमूल डेअरीन (Amul Dairy) चार वेळा दूध दरात वाढ केली आहे. वर्षभरात दुधाच्या दरात जवळपास 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
27 डिसेंबरपासून मदर डेअरीचे दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. यासह चालू वर्षात मदर डेअरीने दुधाच्या दरात पाच वेळा वाढ केली आहे.
वर्षभरात मदर डेअरीने दुधाच्या दरात 20 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळं तूप, पनीर, खवा, दही, लस्सी यांचे दरही वाढले आहेत. सध्या मदर डेअरीचा दूध दर हा 66 रुपये लिटर आहे.
दुधाच्या किंमतीची आकडेवारी जर पाहिली तर 1 जुलै 2021 पूर्वी मदर डेअरीचे दूध 55 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते. ते आता 66 रुपये प्रति लिटरने खरेदी करावे लागत आहे.
गेल्या दीड वर्षात दुधाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं तूप, पनीर, खवा, दही, लस्सी यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळं सध्या मदर डेअरीचा दूध दर हा 66 रुपये लिटर आहे.
गेल्या दीड वर्षात दूध डेअऱ्यांनी वेगवेगळी कारणं देत दुधाच्या दरात अनेकवेळा वाढ केली आहे. दूध महागल्यानं खवा, पनीर, तूप, दही यांचे भाव वाढले आहेत.
ल्या दीड वर्षात दुधाच्या दरात सरासरी 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. महागड्या दुधामुळं तुपाच्या दरात देखील प्रचंड वाढ झाली आहे. वर्षापूर्वी 400 ते 450 रुपये किलोने मिळणारे तूप आता 550 ते 600 रुपये किलोने मिळत आहे.
गेल्या वर्षी 350 रुपये किलोने मिळणारे पनीर आता 400 ते 450 रुपये किलोने मिळत आहे. आता दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळं तूप आणि पनीरचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्षभरात 'मदर डेअरी'नं पाच वेळा दूध दरात वाढ केली आहे. तर गेल्या दीड वर्षात सहा वेळा दुधाच्या दरात वाढ केली आहे, सध्या मदर डेअरीचे दूध हे 66 रुपये लिटरने मिळत आहे.