Mango : अवकाळी पावसाचा देशातील आंबा उत्पादकांना फटका
Mango : बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा उत्पादकांचे मोठं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement
Mango farming
Continues below advertisement
1/10
देशातील काही भागात अवकाळी पावासानंही (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे
2/10
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंबा पिकांची नासाडी केली आहे.
3/10
अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी अस्वस्थ आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळं फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
4/10
पावसामुळं आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
5/10
अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठी नासाडी झाली आहे
Continues below advertisement
6/10
उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील आंबा बागांवर पाऊस आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला आहे.
7/10
अवकाळी पावसामुळं निर्माण झालेला ओलावा, त्यामुळं आंबा पिकावर रोगराई निर्माण झाली आहे.
8/10
ओडिशातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर होताना दिसत आहे. ओडिशामध्ये अवकाळी पाऊस आणि आता तापमानात अचानक वाढ झाल्यामुळं आंब्याच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.
9/10
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा परिणाम आंब्याच्या बागांवर होताना दिसत आहे.
10/10
गेल्या अनेक वर्षांपासून या बदलत्या बावावरणाचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिकांचं नुकसान झाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
Published at : 22 Apr 2023 07:36 AM (IST)