Onion : कांद्याच्या दरात घसरण; बळीराजा संकटात

कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाली आहे.

Maharashtra Agriculture news

1/9
सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाली आहे.
2/9
सध्या नाशिक (nashik) जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. सततचा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळं कांदा शेतातच खराब होत आहे.
3/9
आवक वाढल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
4/9
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाफेडने कांदा खरेदी करण्याची मागणी केली होती. पण त्याचा निर्णय अद्याप न झाल्यानं चाळीतच कांदा खराब होण्याची भीती आहे.
5/9
वास्तविक उन्हाळी कांदा हे साठवणुकीचे पीक आहे. तरीही जवळपास सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे.
6/9
अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितित कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी पुढाकार घेतला होता.
7/9
नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली होती
8/9
कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो.
9/9
भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. मात्र, मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले.
Sponsored Links by Taboola