लम्पीमुळं दीड लाखाहून अधिक जनावरांचा मृत्यू
लम्पीमुळं आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं देशातील पशुपालक चिंतेत आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.
आत्तापर्यंत देशात 29 लाख 52 हजार 223 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागन झाली आहे. याबाबतची माहिती पशुसंवर्धन मंत्रालयानं दिली आहे.
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 6.50 कोटी गायींना लसीकरण केले आहे. आणखी 9 कोटी जनावरांना लसीकरण करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनावरांना लसीकरण सुरु आहे. लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनं केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 1 कोटी 57 लाख जनावरांना आत्तापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे. सर्वात जास्त लसीकरण हे उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे.
महाराष्ट्रात 1 कोटी 31 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आलं आहे. आणखी महाराष्ट्रात 1 कोटी 50 लाख जनावरांना लसीकरण करणे बाकी आहे.
राजस्थानमध्ये 1 कोटी 2 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत लम्पी स्कीनच्या आजारामुळं देशात 1 लाख 55 हजार 724 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं देशातील पशुपालक चिंतेत आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.