भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश
भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Rice Export) देश आहे. भारताच्या तांदळाला जगातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय तांदळाला जगात मोठी मागणी आहे. भारतातून दरवर्षी अनेक देश मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात करतात. अमेरिका, इराण, येमेनसह इतर देशांमध्ये भारताच्या तांदळाला मोठी मागणी आहे.
यावर्षी देशातून तांदळाची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली आहे. देशातून बासमती आणि गैर बासमती तांदळाची आत्तापर्यंत 126 लाख टन निर्यात झाली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे.
भारताने चालू आर्थिक वर्षात 126.97 लाख टन बासमती आणि गैर-बासमती तांदळाची निर्यात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत 7.37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 118.25 लाख टन तांदळाची निर्यात झाली होती.
भारत दरवर्षी विविध देशांना तादंळाची निर्यात करतो. अमेरिका, युरोप आणि सौदी अरेबियासारख्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली जाते. बासमती नसलेला तांदूळ आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो.
दोन तृतीयांश बासमती तांदूळ इराण, सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांमध्ये निर्यात केला जातो. त्या ठिकाणी भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे.
गेल्या खरीप हंगामातील जुलै ते जून या कालावधीत तांदळाचे उत्पादन 111.76 लाख टन होते. ते 2022-23 च्या खरीप हंगामात 1.4.99 दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. बिगर बासमती तांदळावर 20 टक्क्यांपर्यंत सीमाशुल्क आकारण्यात आले होते.
शेतीच्या बाबतीत भारताचा जगात दबदबा आहे. अनेक पिकांचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक लागतो.