Photo : धुळ्यात मिरचीला दराचा 'तडका'

agriculture News

1/10
मिरचीच्या दरात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, बहुतांशी शेतकऱ्यांच्या मिरची पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळं पिकांचं नकसान झालं आहे.
2/10
धुळ्यात अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे.
3/10
धुळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं मिरचीला महागाईचा तडका बसला आहे.
4/10
धुळ्यातील दोंडाईच्या बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. या मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं फायदा होत आहे.
5/10
एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे मिरची आले त्यांना होत आहे.
6/10
रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे.
7/10
धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. या ठिकाणी विविध ठिकाणाहून मिरचीची आवक होते.
8/10
दोंडाईच्या परिसरात देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, या मिरचीवर सध्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.
9/10
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. याचा मिरची पिकालाही मोठा फटका बसला आहे.
10/10
धुळ्यात मिरचीला महागाईचा तडका बसला आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे.
Sponsored Links by Taboola