शेतकऱ्यांना दिलासा! कांद्याला झळाळी, कोणत्या बाजारात किती दर?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात कांद्याचे दर रोज नवनवे विक्रम करत आहेत. राज्यात कांद्याचे भाव 4200 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.
25 जून रोजी नागपूरच्या रामटेक मंडईत केवळ कांद्याला विक्रमी किमान 4 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
बाजारात कांद्याची आवकही कमी झाली आहे, त्यामुळं दरात वाढ होत आहे.
पुणे बाजारात कांद्याला किमान भाव 1200 रुपये, तर कमाल भाव 3000 रुपये आहे.
अकोला बाजारात किमान भाव 2000 रुपये तर कमाल दर 3400 रुपये आहे.
पिंपळगाव बाजारात कांद्याचा किमान भाव 2700 रुपये तर कमाल दर 1700
राहुरी बाजारात कांद्याचा किमान भाव 2301 रुपये, कमाल भाव 2326 रुपये आणि उच्च प्रतीचा कांदा 4313 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय.
कांद्याच्या वाढत्या दरामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे.