Photo : बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका
सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळं पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील हापूस आंब्यावर देखील या बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. कोकणातल्या हापूस आंब्याचे चक्र बिघडले.
आजतागायत केवळ 10 टक्के आंब्याच्या झाडांवरती मोहर आला आहे. त्यामुळं यंदा हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
15 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भारणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर न आल्यास हापूसवरती असलेलं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूसची अपेक्षित मोहोर प्रक्रिया न झाल्यास कामगारांना त्यांचा त्या दिवसापर्यंतचा हिशोब देऊन घरी पाठवलं जाणार आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.
सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानामुळ खूप कमी फळधारणा झाली आहे. त्यामुळं आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
10 फेब्रुवारीपर्यंत मोहोर आला तरच एप्रिलमध्ये सर्वसामान्य लोकांना आंबा खायला मिळू शकतो अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.