Curry Leaves : घरीच लावा कडीपत्ता; जाणून घ्या सोपी पद्धत
Curry Leaves : जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कडीपत्त्याचा वापर भारतीय जेवणात होतो. हा कडीपत्ती घराच्या परिसरातही उगवता येऊ शकतो.
Curry Leaves : घरीच लावा कडीपत्ता; जाणून घ्या सोपी पद्धत
1/9
भारतीय जेवणाची चव वेगळी आहे, इथल्या जेवणात वापरण्यात येणारे मसाले जेवणाची चव वाढवतात.
2/9
त्याचप्रमाणे त्यात कढीपत्ता घालून भाजी, डाळी, भातात कडीपत्ता टाकला जातो.
3/9
कढीपत्ता खाणे अनेकांना आवडते. तुम्हीदेखील घरच्या घरी कडीपत्ताचं झाड लावू शकता.
4/9
सर्व प्रथम, एक भांडे घ्या आणि मातीने भरा. यानंतर त्यात कढीपत्त्याचे बियाणे टाका.
5/9
बियाणे पेरल्यानंतर, मातीला भरपूर पाणी द्यावे. मात्र, पाण्याचे प्रमाण अतिप्रमाणात नसावे.
6/9
दररोज किमान 6 तास भांडे उन्हात ठेवण्याची खात्री करा. वाढत्या रोपाची वेळोवेळी छाटणी करत रहा.
7/9
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर झाडाच्या आकारानुसार भांडे बदलावे.
8/9
कढीपत्ता पूर्णपणे तयार होईपर्यंत 1-2 वर्षे तोडू नये.
9/9
आता झाडाला पूर्ण पाने आल्यावर कुंडीतून मुळे बाहेर काढून जमिनीत लावा.
Published at : 27 Oct 2023 11:20 PM (IST)