माढा तालुक्यात पुराचा शेती पिकांना मोठा फटका, आमदार अभिजीत पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, पंचनामे करण्याचे निर्देश
सीना नदीला पूर आल्यामुळं माढा तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार अभिजीत पाटील यांनी आज पाहणी केली.
Continues below advertisement
MLA Abhijeet Patil
Continues below advertisement
1/10
सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचा पाहणी दौरा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केला.
2/10
माढा तालुक्यातील सिना नदीला पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनास तत्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश माननीय आमदार अभिजीत आबा पाटील यांनी दिले आहेत.
3/10
अभिजीत पाटील यांनी निमगाव, दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड , वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी चांदने साहेब यांना सोबत घेऊन पाहणी केली.
4/10
माढा तालुक्यातील रांझणी, रोपळे कव्हे , म्हैसगाव कुर्डवाडी या 4 मंडलात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सीना नदीकाठ वरील बर्याच भागात शेतात पुराचे पाणी व त्याबरोबर जमीन वाहून जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे.
5/10
शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेले आहे, त्यामुळं पीक नुकसान खूप जास्त झाले आहे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक असल्यानेच शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत व्हायला पाहिजे असे अभिजीत पाटील म्हणाले.
Continues below advertisement
6/10
पूरबाधीत भागात जाऊन कर्तव्य बजावताना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी यंत्राना सज्ज करण्यात आली, अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशू धनाची हानी, संसारोपयोगी साहित्य आदींचे वस्तूंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
7/10
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून माढा, पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील गावांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करून सरकारकडून मदत तातडीने मिळावी यासाठी पत्रही अभिजीत पाटील यांनी दिले आहे.
8/10
निमगाव, दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड , वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
9/10
नुकसानीची पाहणी करण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.
10/10
माढ्याचे तहसीलदार संजय भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी चांदने साहेब यांना सोबत घेऊन आमदार अभिजीत पाटील यांनी पाहणी दौरा केला.
Published at : 18 Sep 2025 11:50 PM (IST)