Bhandara : देशी दारुचा जुगाड, 'भाताची नर्सरी' हिरवीगार
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अनोखा जुगाड केला आहे. भाताच्या नर्सरीवर देशी दारुची फवारणी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यानं भाताची नर्सरी हिरवीगार केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं केलं आहे. देशी दारुच्या (Desi Daru) जुगाडानं शेतकऱ्यानं भात पिकाची नर्सरी (Nursery of Rice crop) जगवली आहे. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) अनाठायी खर्चाला बगल दिली आहे.
दारुमुळं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच बघायला मिळतात. मात्र, भंडाऱ्यातील जेवनाळा येथील शेतकऱ्यानं देशी दारुची सहाय्याने पीक जोपासलं आहे.
अल्पभूधारक शेतकरी प्रमोद भुते यांनी भात पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी करून मरणासन्न अवस्थेतील नर्सरीतील रोपांना रोगमुक्त करत पिकाला नवसंजीवनी दिली आहे.
सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांनी भुते यांची टिंगल टवाळी केली होती. मात्र, आता तेच शेतकरी त्यांची भात पिकांची नर्सरी बघायला शेतात येत आहेत.
भंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा असून या जिल्ह्यात वर्षभरात तीन वेळा भात पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामनंतर आता रब्बी पिकांची लागवड सुरू झाली आहे
मागील 15 दिवसांपूर्वी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल निर्माण होऊन, कडक्याच्या थंडीमुळं पिकांवर परिणाम दिसून आला. बदलत्या वातावरणाचा तांदळाच्या नर्सरीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यानं देशी दारुची फवारणी केली.
भाताचे पऱ्हे पिवळे पडून किडग्रस्त होऊन मरणासन्न अवस्थेत होते. त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक औषधींची मोठ्या प्रमाणात फवारणी केली. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी प्रमोद भुते यांनी भात नर्सरीतील रोपांवर चक्क पाण्याच्या मिश्रणाने देशी दारूची फवारणी केली. त्यानंतर काही दिवसातच त्याचा परिणाम जाणवू लागला.
जी भात नर्सरी मरणासन्न अवस्थेत होती, तीच आता भाताची नर्सरी आता हिरवीगार असून डौलात उभी आहे. देशी दारूच्या जुगाडानं भाताची नर्सरी भुते यांनी जगवली आहे.