Photo : सांगलीतल्या दुष्काळी भागात फुलतेय 'ड्रॅगन फ्रुट'

Dragon Fruit

1/10
सांगलीतल्या दुष्काळी भागात आता 'ड्रॅगन फ्रुट' ची शेती फुलत आहे. शेतकरी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळले आहेत.
2/10
सांगली जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळताना दिसत आहे.
3/10
जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत आहेत. शेतकरी ऊस, द्राक्ष पिकांकडून ड्रॅगन फ्रूटची शेतीकडे जात आहेत. ऊसाच्या शेतीला बगल देऊन शेतकरी घेतायेत ड्रॅगन फ्रुटचं उत्पादन घेत आहेत.
4/10
कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत.
5/10
या पिकाच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
6/10
ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी सुरुवातीला जास्त गुंतवणूक करावी लागते. मात्र, नंतर या पिकातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
7/10
ऊसाची शेती करणारे शेतकरी करतायेत ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत.
8/10
ड्रॅगन फ्रूटची देशासह परदेशातही ड्रॅगन फ्रूटची निर्यात केली जात आहे. परदेशात निर्यात केल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
9/10
सांगली जिल्ह्यातील वांगी आणि तडसर गावातील आनंदराव पवार आणि राजाराम देशमुख हे आज ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत.
10/10
सांगलीतल्या दुष्काळी भागात फुलतेय 'ड्रॅगन फ्रुट' ची शेती. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे.
Sponsored Links by Taboola